Monday, December 5, 2011

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

पेट्रोल वाढले, 74 रुपये झाले,

आम्ही तरीही धुर उडवत गाडी चालवतो,

पेट्रोल हे पाण्यासारखे वापरतो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

Cement concrete ची जंगले झाली,

येता जाता builder lobby ला शिव्या देतो

आणि तरीही “investment” म्हणुन दोन दोन flat घेतो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

अपुरे रस्ते, air pollution, खडयातला रस्ता,

सकाळी पेपर वाचून हळहळ व्यक्त करतो,

आणि तरीही मोठी गाडी घेण्याचे स्वप्नं बघतो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

कलमाडी, राजा, कॉंग्रेस ला शिव्या हासडतो,

अण्णा हजारे ला ‘like’ करतो,

आणि तरीही पोलिसांनी पकडल्यावर पावती फाडु नये म्हणतो हात जोडुन साहेब म्हणतो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

कॉंग्रेस पासुन बीजेपी पर्यन्त सर्वांना देश विकणारे दलाल म्हणुन संबोधतो,

आलिशान सोफ्यावर बसून system बदलण्याची भाषा करतो,

आणि तरीही मतदानाच्या दिवशी सिंहगड/महाबळेश्वर ला हक्काची सुट्टी म्हणुन गर्दी करतो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

मस्त पैकी ‘AC’ मध्ये बसून, eco friendly वर articals वाचतो,

वाढत्या शहरीकरणामुळे झाडे कशी नष्ट होत आहेत यावर भरपूर चर्चा करतो,

तरीही साधे एक झाड लावण्यासाठी आमच्या कडे वेळ नसतो.

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

Facebook वरती हे वाचुन आम्ही छान comment करतो, like करतो, अगदी share सुद्धा करतो,

आणि तरीही विवेकाची पाटी पुसुन, निर्लज्जपणे जीवन जगत रहातो,

गेंडयासारखी कातडी आमची, आम्हाला काय फरक पडतो?

-अनुप शहा

ता. क. - पहिलाच प्रयत्न आहे, गोड मानुन घ्या. :P

No comments:

Post a Comment