Friday, December 28, 2012

देव रिटायर होतो आहे..


आज आपला सचिन one day मधुन रिटायर होतो आहे. त्याच्या रिटायरमेंटच्या आधी आणि नंतर सुद्धा त्याच्या रिटायरमेंटवर जेवढे लेख लिहिले गेले ते आत्तापर्यंतच्या त्याच्या runs पेक्षा कदाचित जास्तच असतील.. असो.. त्याच्या नावावर अजून एक record ;).. पण सचिन देवाचा एक साधा पण सच्चा भक्त म्हणुन माझा अजुन एक लेख-रूपी नैवेद्य.
 
माझे लहानपण इतर मुलांसारखे गल्ली क्रिकेट खेळत खेळत सुरू झाले. मी ८-९ वर्षांचा असेन तेव्हा इंग्लंड भारताच्या दौर्‍यावर आला होता, १९९३ मध्ये. तेव्हा international क्रिकेट फार काही कळत नसायचं. पण एक आठवतं. १९-२० वर्षाच्या दोन बुटक्या पोरांनी इंग्लंडच्या टीम ला भंडावुन सोडलं होतं. त्यांची नावं होती – सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी (तोच जो ९६ वर्ल्ड कप फायनल ल रडला होता J). त्यातल्या त्यात सचिन नावाचं प्रकरण फारच interesting वाटत होतं. Gooch, Gatting सारख्या bowlersना तो आरामात face करत होता.
 
त्यानंतर काही महिन्यातच Hero Cup होता. मला आठवतय, South Africa बरोबर semi-final होती. दिवाळीचा महिना होता. आम्ही मामाच्या घरी सातार्‍याला साधारणतः १२-१३ भाऊ-बहिणी आणि मोठे मॅच बघत होतो. लास्ट ओवर मध्ये ६ runs हव्या होत्या. सचिनने ball हातात घेतला तेव्हा माझ्या मते देशामधल्या अर्ध्याहुन अधिक लोकांची फाटली असणार. पण तेंडल्याने फक्त ३ runs देऊन मॅच जिंकवली होती. तेव्हा भारतात एका महिन्यात दोनदा दिवाळी साजरी झाली होती. त्यानंतर क्रिकेट follow करायची जणु सवयच लागली. सचिनच्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही fan झालो होतो. अगदी त्याच्या आवाजाचे (आयला!) आणि दोन्ही पाय वाकवून guard ‘set’ करण्याच्या style चे सुद्धा J
 
नंतर काही वर्षांनी माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय summer vacation ची सुरवात झाली, १९९८ साली. तेव्हा शारजामध्ये India-Aus-NZ मध्ये तिरंगी लढत (triangular series) होती. त्यात ऑस्ट्रेलिया बरोबर च्या league match मध्ये सचिनने Kasprowicz, Damian Fleming, Shane Warne, Tim Moody यासारख्या bowlersची जी काही मारली होती ती पाहून मला शाळेमधले मास्तर आठवले होते J.
त्यानंतर दोनच दिवसांनी परत Australia बरोबर final होती, सचिनच्या वाढ-दिवशी. सचिनने त्या दिवशी जी काही मार-झोड केली होती ती माझ्या मते ‘out of the world’ होती. त्याने पुढे येऊन Warne ला long-on ला मारलेली six तर मला माधुरी दीक्षित पेक्षा सुद्धा सुंदर वाटली होती. J
मी त्याचा तो shot आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. Tony Greig च्या आवाजात “Sachin Tendulkar is greatest batsman in the world” ऐकताना खरच जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. मला आठवतय, नेमकी तेव्हाच आमच्या घरी lights गेले होते. तेव्हा मी MSEB ला जेवढ्या शिव्या घातल्या आहेत तेवढ्या माझ्या boss ला पण कधी घातल्या नाहीत.
सुदैवाने आमच्या समोरच्याकडे generator असल्यामुळे पुर्ण सोसायटी त्यांच्याघरी देवाला बघायला जमली होती.
त्यानंतर पुढच्याच वर्षी १९९९ च्या वर्ल्ड कप मध्ये तुझ्या वडिलांच्या दुख:द निधनानंतर Kenya विरुद्ध century करून, आकाशाकडे बघून श्रद्धांजली व्यक्त केली होतीस, ते बघून उभा भारत गहिवरला होता. त्यानंतर प्रत्येक century नंतर तु आकाशाकडे बघून वडिलांचे आभार मानतोस यातच सर्व आलं.
 
अश्या एकापेक्षा एक अगणित आणि अद्वितीय आठवणी आम्हा लोकांच्या मनामध्ये साठवून ठेवल्यास तु. Match बघताना, आमच्यामते, “सचिन अजूनही खेळतोय ना” हे एक वाक्यच खुप confidence देऊन जायचं. आता माझ्यासारख्या अनेक लोकांच्यामते क्रिकेट दोन काळात divide झालय. “Before Sachin retired” आणि एक “After Sachin retired” आणि सगळ्यांच्यामते पहिला काळ खुपच अविस्मरणीय होता. २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यावर विराट कोहली ने एका वाक्यात करोडो भारतीयांच्या भावनांना बोलुन दाखवल्या होत्या.
 
सचिन, तुझे नाव हे "सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवले आहे असे काहीसे ऐकल्यासारखे वाटते. ते माझ्या मते खरच सार्थक आहे. "सचिन" सुद्धा आणि "देव" सुद्धा. तुझे देव तुला उदंड आयुष्य देओ हीच प्रार्थना.
 
तुझा एक निस्सीम भक्त, चाहता आणि सदैव ऋणी असा,
-अनुप शहा