Wednesday, April 23, 2008

सचिनबद्दल काही...


सचिन रमेश तेंडुलकर.आपल्या सगळ्यांचा लाड्का सचिन २४ एप्रिल २००८ ला ३५ वर्षांचा होईल.त्यानिमित्त सचिनबद्दल काही...सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं.
सचिन लहानपणी टेनिस स्टार मॅकनरोचा खुप मोठा चाहता होता.
सचिनला लहानपणी फ़ास्ट बॉलर बनायचं होता पण MRF Pace Academy मध्ये डेनीस लीलीने त्याला बॅटींगवर लक्ष द्यायला सांगितलं.
सचिनने आपल्या पदार्पणाच्या रणजी,दुलीप आणि ईराणी सामन्यांमध्ये शतक ठोकलय.हि कामगिरी करणारा सचिन हा एकमेव खिळाडु आहे.
लहानपणी झोपताना तो आपलं क्रिकेट किट बाजुला ठेउन झोपायचा.
सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं.
१९८८ मध्ये एका सराव सामन्यात सचिन पाकिस्तान साठी बदली खेळाडु होता.
लहानपणी गाईड सिनेमा पहाण्यासाठी तो एका झाडावर चढुन बसलेला अस्ताना तो झाडवरुन पडला,त्याची शिक्षा म्हणुन त्याच्या भावाने अजितने त्याला क्रिकेट क्लासला पिटाळलं.
सचिन वडा पावचा खाण्याचा रेकॉर्ड करु शकतो.मित्रांसोबत वडा पाव खाण्याच्या पैजा लावय्लाही तो नेहमी तय्यार असतो.
सचिन आताजरी शांत दिसत असला तरी लहानपणी बराच खोड्कर होता.शाळेत असताना कोणाशीही ओळख झाली कि त्याच्या मनात पहिला विचार यायचा ’मी ह्याला मारु शकेल का?’.
खोड्या काढायची सवय त्याची अजुनही गेली नाहि.एकदा त्याने सौरव झोपलेला असताना त्याच्या रुममध्ये पाण्याचा पाइप सोडुन दिला होता.सौरव उठला तेव्हा रुममधलं सगळं सामान पाण्यावर तरंगत होतं.सचिन सौरवला बाबुमोशाय आणि सौरव त्याला छोटे बाबु म्हणुन हाक मारतो.
सचिनबद्दल खुप काहि लिहिला गेलंय आणि खुप काहि लिहिला जाइल.पण असे कितीहि वर्ष गेली तरी सचिन आपल्या सगळ्यांसाठी सचिनच राहिल.१० वर्षांपुर्वी शारजामध्ये वादळाला तोंड देत जो सचिन ऊभा होता,तो नेहमीच आपल्याला आनंदाचे असे बरेच क्षण देईल ह्यांत शंकाच नाही.सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

No comments:

Post a Comment