Friday, November 9, 2007

दिवाळीचा वैताग

P.S. मी काही प्रथित-यश लेखक नव्हे, त्यामुळे माझ्या लिखाणातुन जास्त अपेक्षा बाळगु नव्हेत.
Happy Diwali, माझ्या client(अमेरीकन) ने मला सकाळी सकाळी विश केला आणी मी मनातल्या मनात सुखावलो.. हो, कारणच तसे होते..सकाळ पासुन मी जरा वैतागलोच होतो.


माझी पहिलीच दिवाळी घराबाहेरची (म्हणजे मी लग्न करुन घर-जावई वगैरे झालो अशातला भाग नाही हं) आणी देशाबाहेरची.. त्यातही इथे काही म्हणजे काही चेलेब्रतिओन नव्हतं. त्यातही रूम-वर दोन वरची आणी एक खालचा (दोन उत्तर भारतीय आणी एक ’अण्णा’ :) आणी ते सर्व वर्षानुवर्षे बाहेर राहीलेले म्हणजे आनंदीआनंद. असो...नाही म्हणलं तरी सकाळी घरी आणी मित्रांना फ़ोन केले होते पण ती मजा फ़ोन वर कशी येनार?? जाता येता बरेच भारतीय दिसले पण कोणी म्हणजे कोणी सुद्धा भारतीय वेशामध्ये नव्हतं साधा शॊर्ट कुर्ता पण नाही म्हणजे कमाल झाली. त्यामुळे अजुनच चिड चिड झाली...

असंच बसलो होतो desk वर timepass करत.. हो ना.. सध्या काही काम नाही आहे :) एकदम सणक आली.. आलो घरी निघुन (माझ्या) मस्तपैकी बिस्मिलाः खान ची शेहनाई लावली आणी बसलो (blog लिहायला हो..) आता जरा मस्तं वाटतयं. चला खुप चावला ना मी तुम्हाला... आता उठतो, मस्तपैकी चहा बनवतो आणी पितो (चहा)

चला.. पुन्हा भेटु असचं काही मिळालं की...

तो पर्यंत.. जय महाराष्ट्र!!!

No comments:

Post a Comment